मुबलक प्रमाणात जलसंपदा असल्याने गोंदिया जिल्हा कृषिप्रधान तर आहेच, शिवाय येथे कृषिप्रधान लघु उद्योग मोठ्या प्रमाणात चालतात. जिल्ह्याचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वनांनी व्याप्त केलेले असल्याने ‘वनोत्पादने’ हा येथील प्रमुख घटक आहे. वनांतून तेंदूची पाने गोळा करणे व त्यांचा वापर विड्या वळण्याच्या उद्योगात करणे - हे प्रमुख उद्योग जिल्ह्यात चालतात.
या शिवाय जिल्ह्यात गोड्या पाण्यातील (तलावांतील) मासेमारी, जंगलांतून डिंक व लाख जमा करणे,बांबूच्या विविध वस्तू बनविणे, मातीच्या विटा, कौले व भांडी तसेच प्राण्यांच्या शिंगापासून वस्तू बनविण्याचे व्यवसाय केले जातात.
गोंदिया व तिरोडा येथे औद्योगीक वसाहती स्थापन झाल्या आहेत. पुढील कोष्टकात जिल्ह्यातील काही प्रमुख उद्योग व त्यांचे ठिकाण नमूद करीत आहोत.
1 मँगनीज शुद्धीकरण माडगी (तालुका तिरोडा)
2 तेल गिरणी खमारी (तालुका गोंदिया)
3 धान (तांदूळ) गिरण्या गोंदिया, तिरोडा, गोरेगाव, आमगाव,
मुंडिकोटा
4 लाकूड कटाई गोंदिया, तिरोडा, नवेगाव बांध, आमगाव,
मुंडिकोटा
5 कागद कारखाना चंगेरा (तालुका गोंदिया)
6 टाइल्स रजेगाव (तालुका गोंदिया)
7 विड्या वळणे गोंदिया, तिरोडा, देवरी,आमगाव,
सालेकसा
या शिवाय जिल्ह्यात गोड्या पाण्यातील (तलावांतील) मासेमारी, जंगलांतून डिंक व लाख जमा करणे,बांबूच्या विविध वस्तू बनविणे, मातीच्या विटा, कौले व भांडी तसेच प्राण्यांच्या शिंगापासून वस्तू बनविण्याचे व्यवसाय केले जातात.
गोंदिया व तिरोडा येथे औद्योगीक वसाहती स्थापन झाल्या आहेत. पुढील कोष्टकात जिल्ह्यातील काही प्रमुख उद्योग व त्यांचे ठिकाण नमूद करीत आहोत.
| क्र. | उद्योग/व्यवसाय | ठिकाण |
2 तेल गिरणी खमारी (तालुका गोंदिया)
3 धान (तांदूळ) गिरण्या गोंदिया, तिरोडा, गोरेगाव, आमगाव,
मुंडिकोटा
4 लाकूड कटाई गोंदिया, तिरोडा, नवेगाव बांध, आमगाव,
मुंडिकोटा
5 कागद कारखाना चंगेरा (तालुका गोंदिया)
6 टाइल्स रजेगाव (तालुका गोंदिया)
7 विड्या वळणे गोंदिया, तिरोडा, देवरी,आमगाव,
सालेकसा
No comments:
Post a Comment